‘अमिताभ, अक्षय यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण रोखून दाखवाच – गिरीश महाजन

नवी दिल्ली : यूपीए सरकारवेळी पेट्रोलचे दर वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी टीका केली होती. आता तिच परिस्थिती आहे. देशात पेट्रोलचे भाव शंभरीवर गेले आहेत. असे असताना ते दोघेही काहीच बोलत नाहीत. म्हणून त्यांच्या चित्रपटांचे शुटिंग राज्यात होऊ देणार नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली होती.

आमचे सरकार सत्तेवर असताना पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावर तुम्ही सरकारवर टीका केली होती. आता मोदी सरकार सत्तेत आहे, पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही मोदी सरकारवर टीका करा. नसता तुम्हाला तुमचे काम करू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता.

दरम्यान, भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवाच’, असं आव्हान देत महाराष्ट्रात काय मोगलाई आहे काय?’, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.

तसेच पेट्रोल-डिझेलच्या मुद्दयावरून कोणीही राजकारण करू नये. राम मंदिर हा आमच्या अस्थेचा प्रश्न आहे. असंही महाजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या