कचरा प्रश्न औरंगाबाद: टीव्ही सेंटर मध्ये जेसीबीवर दगडफेक

औरंगाबाद कचरा प्रश्न

औरंगाबाद: शहराच्या कचराकोंडीनंतर महापालिकेने कचऱ्याचे ओला-सुका असे वर्गीकरण करुन विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मागील आठवड्यात महापालिकेला कचरा प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करण्याची सूचना केली होती. पन सोमवारपासून प्रशासनाने दिसेल त्या मोकळ्या जागेत खड्डा करून ओला-सुका कचरा पुरण्यास सुरुवात केली.

टीव्ही सेंटर परिसरात स्वामी विवेकानंद उद्यानाची बावीस एकर जागा आहे. ही जागा महापालिकेने गेल्या काही दिवसापासून हेरून ठेवली होती. दोन दिवसांपासून या जागेत सुमारे वीस ट्रक कचरा पुरला आहे. रात्री महानगर पालिकेच्या जेसीबी द्वारे खड्डा खोदण्याचे काम चालू होते. हे महिती होताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकणि धाव घेतली. त्याठिकाणी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय व दूरदर्शन कार्यालय आहे. तसेच मोठी नागरी वसाहत असल्याने दुर्गंधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐथे कचरा टाकू दिला जाणार नाही अशी भूमिका घेत नागरिकांनी जेसीबीवर दगडफेक केली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.