पुण्यात स्कूलबस वर दगडफेक ; शिरोळेंनी आंदोलनकर्त्यांना फटकारले…

पुणे : पुण्यात ‘भारत बंद’ चे पडसाद उमटायला सकाळपासूनच सुरुवात झाली होती. मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी कुमठेकर रस्त्यावर पीएमटी बस वर दगडफेक करत आंदोलनाला सुरवात केली तर कोथरूड मध्ये काही अज्ञातांनी पहाटे एक पीएमटी बस ला आग लावल्याची घटना समोर आली आहे. मात्र आता पुण्यात या आंदोलनात स्कुलबस वर दगडफेक झाल्याचा दावा पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी केला आहे. पुण्यातील संस्कृती हायस्कुल आणि अजून एका महाविद्यालयाच्या बस वर दगडफेक झाल्याचे फोटो अनिल शिरोळे यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केले आहेत.

तथाकथित विरोधी पक्षांनो तुम्हाला निषेधाचा अधिकार जरूर आहे परंतु तरुणांना भ्रमित करून, निर्दोष शालेय मुलांना वर निशाण साधून, सार्वजनिक मालमत्ता नष्ट करून, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नागरिकांना मध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न कारणे तुमच्या नेत्यांची दयनीय परिस्थिती उदाहरण आहे. अशा शब्दांत अनिल शिरोळे यांनी आंदोलनकर्त्यांना फटकारले देखील आहे.