बालाजीच्या दर्शनाला गेलेल्या अमित शहांच्या ताफ्यावर टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक

टीम महाराष्ट्र देशा- तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांना एनडीएतून बाहेर पडलेल्या तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी अमित शहांच्या ताफ्यावर दगडफेक केली.

आज अमित शहा यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन अमित शहा हे तिरुमला हिल येथून रेनीगुंटा विमानतळाकडे परतत असताना तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. ‘अमित शहा गो बॅक’चे नारे दिल्याचे वृत्त आहे.या ताफ्यातील एका कारच्या काचा फुटल्या. मात्र शहा यांच्या गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होते. मात्र चार वर्षांत आश्वासन पूर्ण न केल्याने टीडीपी एनडीएतून बाहेर पडला आहे. यामुळे आज अमित शहा यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन रेनीगुंटा विमानतळाकडे जात असताना टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

You might also like
Comments
Loading...