‘चिंता करू नका, टायगर अभी जिंदा है,’ शिवराजसिंह चौहान यांची डरकाळी

भोपाळ: गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपचा मध्यप्रदेश मध्ये निसटता पराभव झाला असला तरी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘चिंता करू नका, टायगर अभी जिंदा है’ अशी डरकाळीच फोडली आहे.

मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत  शिवराजसिंह चौहान हे त्यांच्या बुधनी मतदारसंघातून बहुमताने विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती विरोधी पक्षनेता म्हणून करावी अशी चर्चा असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाला विरोध केला आहे. त्यामुळे शिवराजसिंह यांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवराजसिंह यांनी आज बुधनीत आपली भूमिका स्पष्ट केली.

Loading...