राज्यात शिक्षकांची दिवाळी

teacher image

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य शासनाच्या विरोधात निकाल लावला आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या केलेल्या बदल्या न्यायालयाने रद्द केल्या असून मे महिन्यापर्यंत शिक्षकांच्या बदल्या करता येणार नसल्याचे जाहीर केले आहे. पुणे शिक्षक संघाच्या याचिकेवर आज उच्य न्यायालयाने निर्णय दिला आहे.

शिक्षकांच्या बदल्यावरून न्यायालयाने आज राज्य शासनाला चांगलेच ठणकावले. राज्य शासनाव्दारे वेगवेगळ्या प्रवर्गात शिक्षकांची विभागणी करुन संगगणकीय प्रणालीव्दारे बदली करण्याचा निर्णय शासनाने फेब्रुवारीमध्ये घेतला होता त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. तसेच बदल्यांमुळे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बदल्या मे महिन्यापर्यंत शासनाला करता येणार नसल्याचे सांगितले आहे.त्यामुळे येत्या मे महिन्यापर्यंत तरी शिक्षकांच्या बदल्या होणार नसल्याचे स्पष्ट झाले आ