fbpx

कितीही बैठका झाल्यातरी बेस्ट कर्मचारी संपावरचं

टीम महाराष्ट्र देशा : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. यावेळी न्यायालयानं सर्वसामान्यांना वेठीला धरू नका, अशा शब्दांमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांना दटावले आहे. यावेळी सरकारचे महाधिवक्ते न्यायालयात हजर नसल्याने न्यायालयाने याबाबतची सुनावणी तहकूब केली.

गेले सात दिवस बेस्ट कर्मचारी संपावर गेले असून हा संप आतापर्यंतचा सर्वात मोठा संप आहे. याबाबत आज मंत्रालयामध्ये उच्च स्तरीय चर्चा झाली तरी बेस्ट कर्मचारी माघार घेण्यास तयार नाही. बेस्ट कर्मचार्यांच्या या संपाबाबत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर संपर्क झाला तर राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

बेस्ट कर्मचाऱ्यांंना मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस देऊन देखील बेस्ट कर्मचारी माघार घेण्यास तयार नाही. सात दिवस बेस्ट कर्मचारी संपावर असल्याने बेस्ट चे १८ कोटीचे नुकसान झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयात संपा बाबत याचिका दाखल झाली आहे. राज्य सरकारने कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापन केली असून या समिती बरोबर बेस्ट अध्यक्षांच्या चर्चा सुरु आहेत.