fbpx

हार्दिकमध्ये स्टीव्ह वॉला दिसतेय ‘या’ महान क्रिकेटरची झलक

hardik pandya all rounder player

लंडन : क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ऐन रंगात आली असून या स्पर्धेत भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हार्दिकच्या खेळाची मोहिनी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉ याला देखील पडली असून हार्दिकवर त्याने चांगलीच स्तुतिसुमने उधळली आहे.

हार्दिकच्या खेळीबाबत स्टीव वॉ म्हणतो की, क्लुसनरसारखी हार्दिकची फलंदाजी आणि गोलंदाजीची शैली आहे. हार्दिकच्या वादळी फलंदाजीचा सामना कसा करावा, याचे उत्तर विरोधी संघातील गोलंदाजांकडे नसून तो या स्पर्धेत सर्वांवर भारी पडेल. वॉ पुढे म्हणाला, १९९९ साली चमकणाऱ्या क्लुसनरसारखा हा मुलगा आहे असं म्हणत त्यांने हार्दीकचे तोंडभरून कौतुक केले आहे.