पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया

smith

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यान चर्चेत राहणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यातीलच एक म्हणजे या सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात अनेकांनी केलेल्या दाव्यानुसार तो भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा बॅटींग मार्क हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आता याबाबत खुद्द स्मिथनेच मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ ज्या प्रकारे व्हायरल झाला आणि त्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या, त्याबद्दल स्मिथने नाराजी व्यक्त केली आहे.

स्मिथने म्हटले आहे की ‘मला या प्रकारे आलेल्या प्रतिक्रियांमुळे धक्का बसला आहे आणि मी निराश झालो. आपण कुठे गोलंदाजी करतोय, फलंदाज ती गोलंदाजी कशी खेळतायेत, याचा विचार करण्यासाठी मी अशा गोष्टी सामन्यांदरम्यान करत असतो आणि मी नेहमीच्या सवयीप्रमाणे माझे सेंटर मार्क करतो.’

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनीमध्ये टेस्टचा पाचवा दिवस ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या नावे राहीला. पण स्टीव स्मिथ आपल्या कृत्यामुळे ट्वीटरवर ट्रेंड करु लागलाय. मॅचच्या चौथ्या डावादरम्यान ड्रिंक्स ब्रेक झाल्यावर ऋषभ पंत पीच सोडून पाणी पिण्यासाठी गेला. यावेळी संधीचा फायदा घेत स्टीव स्मिथ पीचला नुकसान पोहोचवण्याचे काम केले. ऑस्ट्रेलिया टीम विकेट घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे या प्रसंगातून दिसले.

आपल्या बॉलर्सना मदत करण्यासाठी स्मिथने हे टोकाचं पाऊल उचलंल. स्टीव्ह स्मिथचा हा कारनामा स्टम्पला असलेल्या कॅमेरामध्ये कैद झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ऑस्ट्रेलियन संघांमध्ये ४९ क्रमांकाची जर्सी स्मिथ वापरतो, त्यामुळे स्मिथच्या खेळ भावनेवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित झाली.

महत्वाच्या बातम्या