पॅट कमिन्सला कर्णधारपद दिल्यानंतर स्टीव्ह स्मिथची मोठी प्रतिक्रिया

पॅट कमिन्सला कर्णधारपद दिल्यानंतर स्टीव्ह स्मिथची मोठी प्रतिक्रिया

Steve Smith

कानपूर : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स (Pat Cummins) ला संघाचा कर्णधार आणि स्टीव्ह स्मिथला उपकर्णधारपद दिले आहे. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ने एशेज मालिकेपूर्वी या महत्त्वाच्या बदलाबद्दल सांगितले आहे. या दोघांची ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पाच सदस्यीय पॅनेलने शुक्रवारी जाहीर केले की कमिन्स संघाचा कर्णधार असेल, तर स्मिथ उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.

स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता, मात्र बॉल टेम्परिंगच्या वादानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. एशेज मालिकेपूर्वी  झालेल्या या बदलांवर बोलताना स्मिथने सोशल मीडियावर लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियन संघाचा 47 वा कसोटी कर्णधार बनल्याबद्दल पॅट कमिन्सचे अभिनंदन. तो एक महान खेळाडू आहे आणि कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करेल. त्याच्यासह उपकर्णधारपदी निवड झाल्याचा मला अभिमान आहे.

कर्णधारपदी निवड झाल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला की, ‘टीम पेनने गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे, त्याच पद्धतीने संघाचे नेतृत्व करायला आवडेल.’

काही दिवसांपूर्टीवी टीम पेनने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सहकारी महिलेला अश्लील मेसेज पाठवलेले प्रकरण समोर आल्यानंतर टीम पेनने हे पावूल उचलले आहे.

महत्वाच्या बातम्या: