स्टिव्ह स्मीथकडेच संघाचे नेतृत्व द्यावे; कर्णधार टिम पेनने व्यक्त केली इच्छा

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासुन ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदाविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधान आले होते. त्यात भारताविरुद्ध मायदेशात मालिका गमावल्यानंतर कर्णधार बदलण्याची मागणी जोर धरु लागली. मात्र कर्णधार पद कोणाकडे द्यायचे हा प्रश्न कायम होता.

ऑस्ट्रेलिया संघाचा सध्याचा कर्णधार असलेला टिम पेनने आता याबाबतीत मोठे वक्तव्य केले आहे. पेन म्हणाला की,’जर भविष्यात मला कर्णधारपद सोडण्याची वेळ आली तर मी कर्णधारपदासाठी स्टिव्ह स्मिथचे नाव पुढे करेन. कारण स्मीथच्या नेतृत्वाखाली खेळताना तो मला चांगला कर्णधार वाटला. आता जर त्याला पुन्हा कर्णधारपद देण्यविषयी चर्चा सुरु असेल तर माझा कर्णधार म्हणून स्टिव्ह स्मिथला नेहमीच पाठिंबा असणार आहे’ असे टिम पेन म्हणाला आहे.

यापुर्वी स्मिथने खुद्द संघाचे कर्णधारपद भूषवण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलुन दाखवले होते. २०१८ साली ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असताना जोहान्सबर्गमध्ये बॉल टेम्परिंग प्रकरणामध्ये स्मिथ दोषी दोषी आढळला होता. या नंतर कारवाई म्हणून स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती, टीम पेनने यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णदापपदाची सूत्रे हाती घेतली होती.

महत्वाच्या बातम्या

IMP