अखेर तूतीकोरीनमधील स्टारलाईट कॉपर कंपनीला टाळं

चेन्नई : तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात स्थानिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आलं होतं. स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन मागील एक महिन्यापासून सुरु आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता.

दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन, तामिळनाडू सरकारने अखेर या प्रकल्पाला टाळं ठोकलं आहे. प्रकल्पाविरोधात लोकांनी आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ जणांचा मृत्यू झाला होता. अखेर सामान्य नागरिकांच्या लढ्याला यश मिळालं असून, सरकारने प्रकल्प कायमस्वरुपी बंद केला आहे. तामिळनाडू सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कॉपर प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.