‘स्लॉग ओव्हर्स’मध्ये भुवनेश्वर, बुमरा सर्वोत्तम

वेब टीम :‘भुवनेश्वर आणि बुमरा हे ‘स्लॉग ओव्हर्स’मधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याच सांगत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने या दोन भारतीय गोलंदाजांची तोंडभरून स्तुती केली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना झाल्यावर प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानेही त्यांची पाठ थोपटली.

सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड होत असताना भुवनेश्वर आणि बुमरा या दोन गोलंदाजांनी कामगिरी उंचावत मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्यात एकवेळ तीनशेहून अधिक धावसंख्या उभारणार असेच वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना ५० षटकांत ६ बाद २९३ धावांचीच मजल मारता आली. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सहज फलंदाजी करून विजय साकार केला.

पराभवाचे स्मिथ ने केलेले विश्लेषण

‘‘विजयाजवळ यायचे आणि पराभव पत्करायचा, असा अलीकडे जणू ऑस्ट्रेलियाचा ‘ट्रेंड’च पडला आहे. आम्ही चांगली सुरवात करतो; पण त्याचा फायदा उठवू शकत नाही. आम्ही कामगिरीचे कसे प्रदर्शन करतो यावरच बरेच अवलंबून आहे.चुकीच्या चेंडूवर चुकीचा फटका खेळण्याची सवय आणि भारतीय गोलंदाजांनी नेमक्या क्षणी उंचावलेली कामगिरी यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. मुख्य म्हणजे सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये भुवनेश्वर आणि बुमरा हे सर्वोत्तम गोलंदाज आहेत असेच त्यांच्या कामगिरीवरून म्हणता येईल. त्यांनी आज अप्रतिम मारा केला.’’

You might also like
Comments
Loading...