fbpx

इयत्ता पाचवी, आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०१८ रोजी

std.5th & 8th sclorship exam on 18th feb,2018

राज्यातील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात येणार असून यासंदर्भातील अधिसूचना ३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हि परीक्षा घेण्यात येते . यंदा परिषदेकडून वर्षभरातील परीक्षांचे वेळापत्रक पहिल्यांदाच परिषदेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.

आजपर्यंत परीक्षा जवळ आल्यानंतरच त्या परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती मिळत होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच परीक्षा परिषदेने २०१७-१८ या वर्षातील सर्व परीक्षांचे वेळापत्रक आपल्या वेबसइटवर जाहीर केले आहे. या वेळापत्रकात ट्रेन्ड टिचर्स सर्टिफिकेट फॉर अँग्लो इंडियन स्कूल (टीटीसी परीक्षा), राष्ट्रीय इंडियन मिलेटरी कॉलेज परीक्षा, डीटीएड/डीएलईडी, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा व लघुलेखन परीक्षा, शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी, हिंदी घेण्यात आल्या आहेत. यापुढे २९ सप्टेंबर रोजी होणारी शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा विशेष कौशल्य परीक्षा (जीसीसी-एसएसडी-सीटीसी) घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ५ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. डीटीएड/डीएलईडी पुर्नपरीक्षेसंदर्भातील अधिसूचना १ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून ही परीक्षा २१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज परीक्षा १ व २ डिसेंबर रोजी होणार आहे. अर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ३ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत अधिक माहिती www.mscepune.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले.