टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction) घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन ही जवळजवळ प्रत्येकाची समस्या बनते. त्यामुळे थंडीमध्ये सतर्क राहण्याची प्रत्येकाला गरज असते. या हिवाळ्यामध्ये तुम्ही काही घरगुती पद्धतींचा उपयोग करून सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्या पासून दूर राहू शकतात. त्याच घरगुती पद्धती बद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत. या पद्धती वापरून तुम्ही आजारी न पडता या गुलाबी थंडीचा आनंद घेऊ शकता.
हिवाळा (Winter) मध्ये जास्तीचे खाणे टाळा
हिवाळ्यामध्ये प्रत्येकाची भूक वाढते असे म्हटले जाते. आरोग्य तज्ञांच्या मते, थंडीत कार्बनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे प्रत्येकाला जास्त भूक लागते. अशा परिस्थितीत शरीरात सेरोटनिन हार्मोन्सचे प्रमाण देखील वाढते. परिणामी आपला मूड खराब राहतो. अशा परिस्थितीत आपण खाण्यावर नियंत्रण ठेवून किमान अन्नाचे सेवन केले पाहिजे. हिवाळ्यामध्ये आपण आपल्या आहारात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा समावेश करावा. त्याचबरोबर फास्ट फूड, चिप्स आणि चॉकलेट पासून दूर राहावे. हिवाळ्यामध्ये योग्य प्रकारचा आहार योग्य प्रमाणात घेतल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहा.
हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार आणि झाकून ठेवा
हिवाळ्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढताच आपण उबदार कपडे घातले पाहिजे. कारण हिवाळ्यात व्हायरल ताप वाढतो. अशा परिस्थितीत उबदार कपडे घातले पाहिजे. शरीर उबदार आणि झाकलेले असल्यावर तुम्ही मौसमी आजारांपासून दूर राहू शकतात.
हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी प्या
हिवाळ्यामध्ये पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते. पण नेहमी लक्षात ठेवा की, थंडीमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे कितीही थंडी असली तरी मुबलक प्रमाणात पाणी पिले पाहिजे.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Imran Khan । इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला, पाकिस्तानात खळबळ
- Skin Care Tips | टोमॅटोचा वापर करून चेहऱ्यावरील ‘या’ समस्येपासून मिळेल सुटका
- Sudhir Mungantiwar | खोके हा कपोकल्पित उभा केलेला शब्द – सुधीर मुनगंटीवार
- Jayant Patil | अजित पवारांना ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात नाहक बदनाम केले- जयंत पाटील
- Whatapp Update | व्हाट्सअपच्या नवीन अपडेटव्दारे 32 लोक एकाच वेळी करू शकतील व्हिडिओ कॉल