fbpx

नगरपरिषदेने फक्त जागा द्यावी महाराजांचा पुतळा स्वखर्चातुन बसवू – नागेश वनकळसे

टीम महाराष्ट्र देशा : शिवाजी चौकामध्ये नगरपरिषद प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी तिथे , महाराजांचा अप्रतिम असा पुतळा स्वखर्चातुन बसवून देण्याचे अभिवचन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा युवा नेते नागेश वनकळसे (सर) यांनी दिले आहे. मोहोळ शहरातून जवळपास १०० गावांचे व्यवहार होतात. त्यामुळे शहरात प्रवेश करताना महाराजांचे दर्शन व्हावे आणि एक प्रेरणा मिळावी यासाठी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणे आवश्यक आहे.

याबाबत सविस्तर आपली भुमीका मांडताना नागेश वनकळसे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे नितीवान, शिलवान आणि सुराज्याचे विचार आहेत, छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन आज उभ्या महाराष्ट्राची वाटचाल ही शिवरायांच्या विचारांवर आहे, छत्रपतीं नंतर बहुजन प्रतिपालक, अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभा करणारा राजा पुन्हा होणे नाही.

मोहोळ शहर हे सांस्कृतीक वारसा असलेल शहर आहे, सदगुरू नागनाथ महाराजांचे मंदिर, चंद्रमौळी गणेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थी स्मारक आहे, बौध्द विहार आहे, त्यामुळे शहराच्या सौंदर्यांत आणि वैचारीक उंची मध्ये भर घालायची असेल तर शिवाजी चौकामध्ये महाराजांचा अप्रतिम असा पुतळा स्वखर्चातुन बसवून देईन असे वचन शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख तथा युवा नेते वनकळसे यांनी दिले.

3 Comments

Click here to post a comment