अजित पवारांनी बीडमध्ये येवून दाखवावे, त्यांना जिवंत पेटवू;शिवसेना जिल्हाप्रमुखाची थेट धमकी

बीड : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. पुण्यात राष्ट्रवादीने सामना या शिवसेनेच्या मुखपत्राची होळी केल्यानंतर आता बीडमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून शिवसैनिकांनी पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला.

दरम्यान,अजित पवारांनी बीड मध्ये ताफा घेवून यावे त्यांना जिवंत पेटवून देवू असा इशारा बीड जिल्हा शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांना पक्ष प्रमुखांकडे जाण्याची गरज नाही बीड चे शिवसैनिक काफी आहेत,असे म्हणत हिम्मत असेल तर मुतऱ्या अजित पवारांनी बीडमध्ये येवून दाखवावे, त्यांना जिवंत पेटवू अशी धमकी दिल्यामुळे  शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भांडणं चांगलेच पेटलं असल्याचं चित्र आहे.

भ्रष्टाचाराच्या गटारात राहणाऱ्यांनी गुण संपन्न व्यक्तीवर चिखलफेक करू नये, हा शिवरायांचा महाराष्ट्र अजित पवारांना कधीच माफ करणार नाही, अशा शब्दात शिवसैनिकांनी अजित पवारांचा निषेध केला. अजित पवारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याची लायकी नाही, संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळात ढकलण्याचे पाप अजित पवारांनी केले आहे, या पुढे अजित पवारांना माफी नाही, असं कार्यकर्ते यावेळी म्हणाले.