मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १२ कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी खरेदी केली आहे. यावरून विरोधक मोदी सरकारवर निशाणा साधत असल्याचे बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील आजच्या सामनामधील रोखठोक सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांना जहरी शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘सामानाची पत्रकारिता… पप्पू च्या आरत्या, घरझुंझाराची पाठराखण, पंतप्रधानांविरुद्ध गरळ, उसना आव आणि म्याव म्याव’, असे ट्विट करत भातखळकरांनी शिवसेना व खा. संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
सामानाची पत्रकारिता…
पप्पू च्या आरत्या
घरझुंझाराची पाठराखण
पंतप्रधानांविरुद्ध गरळ
उसना आव
आणि म्याव म्याव— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 2, 2022
आजच्या रोखठोक सदरात राऊत म्हणाले आहेत, ‘महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. २८ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात’.
महत्वाच्या बातम्या
- …त्यामुळे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये- संजय राऊत
- ‘मावळत्या वर्षातील जळमटे दूर करून खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा’
- ‘यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?’, संजय राऊतांचा सवाल
- ‘ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे,त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये’
- ‘रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा…’, राम सातपुतेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<