fbpx

माढ्यात तुल्यबळ उमेदवार देवुन कमळ फुलवणारच : सुभाष देशमुख

subhash deshmukh

कऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा तुल्यबळ उमेदवार असेल. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वाटुन दिलेली आहे. माझ्याकडे माढा आणि सोलापुर मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात तुल्यबळ उमेदवारी देवुन तेथे पक्ष्याच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणून कमळ फुलवणारच असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज गुरुवारी कऱ्हाड येथे व्यक्त केला.

दरम्यान, मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय कार्यसमितीची महत्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. माढा लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

2 Comments

Click here to post a comment