मुंबईकडून चेन्नईचा दारूण पराभव; धोनी म्हणाला…

पुणे : चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईला पराभूत करत मुंबईने बाराव्या हंगामातील आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने अनेक विक्रम आपल्या नावे नोंदवले आहेत. मुंबईने सातत्याने चारवेळा धोनीच्या संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.

आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईवर विजय मिळवणं मुंबईसाठी सोपी गोष्ट नव्हती. 21 सामन्यात चेन्नईनं 18 सामन्यात विजय मिळवला आहे तर, 3 सामन्यात पराभव मिळाला आहे. तीनही वेळा मुंबईनं चेन्नईला पराभूत केलं आहे.

दरम्यान, या दारूण पराभवानंतर धोनी म्हणाला, ‘घरच्या मैदानावर खेळताना खेळपट्टी लवकर समजायला पाहिजे होती. आम्ही येथे 6 ते 7 सामने आधी खेळलो आहे. हाच घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होता. आम्हाला खेळपट्टी कशी असेल हे जाणून घेण्याची आवश्यकता होती. चेंडू बॅटवर नीट येत आहे की नाही, अशा काही गोष्टी आम्ही नीट केल्या नाही. मला वाटते फलंदाजीमध्ये सुधारणा व्हायला हवी.’

त्याचबरोबर धोनी पुढे म्हणाला, ‘हे सर्वोत्तम फलंदाज आहेत. आम्ही चांगली फलंदाजी करत आहोत असे वाटले होते, परंतू काही चूकीचे फटके मारले गेले. हे असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे. ते अनुभवी आहेत. त्यांना परिस्थितीचा आंदाज यायला हवा होता. आशा आहे की आम्ही पुढील सामन्यात चांगला खेळ करु.’