राज्य राखीव पोलीस बलाच्या ७० व्यावर्धापनदिनामित्त आज कार्यक्रम

State Reserve Police Force

मुंबई, दि. 5  :  राज्य राखीव पोलीस बलाच्या70 वा वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त उद्या दि. 6 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 8, गोरेगाव येथील मुख्य कवायत मैदान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पोलीस बलातील उत्कृष्ट परेड संचलन करणारे 130 पोलीस कर्मचारी समारंभावेळी बंदुकीच्या हर्ष फायरद्वारे 360 फैरी हवेत झाडुन प्रमुख अतिथी पोलीस महासंचालक यांना मानवंदना देणार आहेत. तसेच, पोलीस दलामध्ये प्रशंसनीय कामगिरी करणारे पोलीस अधिका-यांचा गौरव करून सत्कार करण्यात येणार आहे. याचबरोबर पोलीस बलाने आयोजीत केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या अधिका-यांना बक्षिस प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  पोलीस महासंचालक, मुंबई व अपर पोलीस महासंचालक,राज्य राखीव पोलीस बल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.Loading…
Loading...