fbpx

नंदुरबारच्या छायाचित्रकाराला राज्यस्तरीय फोटोग्राफी पारितोषिक

nagpur state photography award

नंदुरबार : येथील छायाचित्रकार नितीन पाटील यांना नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषीक मिळाले. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनतर्फे ‘रस्त्यावरील जनजीवन’ या विषयावर आधारीत झालेल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत छायाचित्रकार नितीन पाटील यांना राज्यस्तरीय उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले असून एक हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे पारितोषीकाचे स्वरुप आहे. दि.२० ऑगस्ट २०१७ रविवार रोजी नागपूर येथे होणार्‍या कार्यक्रमात पाटील यांना पारितोषीक वितरीत करण्यात येणार आहे. पाटील यांच्या ‘डोंबारीचा खेळ दाखविणारी मुलगी व शाळकरी मुले’ या छायाचित्रास पारितोषीक मिळाले.      पाटील यांचे यापूर्वी सारंगखेडा येथे झालेल्या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. त्यांना विविध विभाग, शासनामार्फत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषीक मिळाले आहेत. तसेच फोटोग्राफीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

1 Comment

Click here to post a comment