जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेला विरोधकांच्या भूमिकेचे आव्हान – नीलम गोऱ्हे

Shiv Sena leader Nilam Gorhe

धुळे : राज्यातील विरोधक हे पंक्चर झालेले आहेत आणि भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात मधुर संबंध आहेत, त्यामुळेच जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेला विरोधकांच्या भूमिकेचे आव्हान आहे, असा दावा शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोरे यांनी केला. त्या धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. या वेळी आमदार गोरे यांनी विखरणला जाऊन धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. धर्मा पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांना देखील 2013 च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी विधानपरिषद मध्ये आवाज उठवणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

शिवस्मारक आणि मॅग्नेटीक महाराष्ट्राच्या मुद्यावरूनही त्यांनी भाजपाला लक्ष केले. भाजपचे जे पोटात आहे तेच ओठावर असल्यामुळेच छिदंमसारखे लोक समोर येत असल्याचा आरोप करीत, दावोसमध्ये निरव मोदींसोबत फोटो काढताना प्रोटोकॉल आडवा येत नाही आणि मॅगनेटीक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमंत्रण दयायला प्रॉटोकॉल कसा आडवा येतो ? असा खोचक प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपच्या सत्ते चोरांना अच्छे दिन असल्याचा घाणाघातही त्यांनी भाजपवर केला.

Loading...

फडणवीस चांगले आहेत मात्र गृह विभागाकडून पोलिसांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. 1999 मध्ये गुन्हा घडण्याचे प्रमाण 5-6 टक्के होते. ते आता 8 टक्के झाले आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यावर गुण्याचे प्रमाण वाढतले आहे. गुणेगार आसरा घेतात आणि अत्याचारापासून संरक्षण मिळवित आहेत. तर आता क्रॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस डल्ला मारून हल्लाबोल आंदोलन करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले