केंद्रा पाठोपाठ राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाल्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारचे वेध इच्छुकांना लागले आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुचर्चित फेरबदल रविवारी दि.३ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारोह राष्ट्रपती भवनात सकाळी १० वाजता होणार आहे.

पुढच्या आठवड्यात 5 तारखेला अनंत चतुर्दशी आहे आणि त्यानंतर पितृपंधरवडा सुरू होत आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांत राज्य मंत्रीमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता नाही. पितृपक्षानंतर लगेच नवरात्र सुरू होईल. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.