राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर ; केंद्रीय नेतृत्वाचे मुख्यमंत्र्यांना आदेश

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. असे असताना राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार पुढे ढकलण्याच्या सूचना केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.

पावसाळी अधिवेशनांनतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, आता हा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारास केंद्रीय नेतृत्वाने अद्याप परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात येते. राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणावरून अस्वस्थता आहे. अगोदर राज्यातील परिस्थिती हाताळण्याकडे लक्ष द्या, अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्याचे सूत्रांकडून समजते.

भाजपच्या डोकेदुखीत वाढ ; अजून एक मोठा मित्रपक्ष नाराज

राज्यसरकार कडून खुशखबर 1 जानेवारीपासून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

आपल्या मागण्य़ांसाठी संप करणं हा त्यांचा हक्क : विनोद तावडे