कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

pandurang-fundkar-1

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आज दुख:द निधन झालं. ते 67 वर्षांचे होते.  हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने राज्याने एक मोठ राजकीय नेतृत्व गमावल्याची भावना आहे.
दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.