‘फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची हकालपट्टी करा’

blank

मुंबई : पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपच्या नेत्याचा आणखी एक जरा वेगळा कारनामा काल समोर आला. मोदींच्या ना खाउंगा ना खाने दुंगा या स्लोगन ला त्यांच्याचं पार्टीच्या नेत्यांनी सुरुंग लावण्याचे काम सुरु केले आहे की काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याविरोधात कोर्टाच्या आदेशावरून औरंगाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्यासाठी एक कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि अन्य चार जणांवर आहे. औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

राज्यमंत्र्यावरचं फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने सरकावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने याबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यमंत्री कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मंत्रिपदावर राहाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.