fbpx

राज्य विधीमंडळाचं अधिवेशन २५ फेब्रुवारी ते २ मार्च असे होणार

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं अधिवेशन हे २५ फेब्रुवारी ते २ मार्च असे होणार आहे. तर २७ फेब्रुवारीला या अधिवेशनात राज्याचं वार्षिक अर्थसंकल्प सादर होणार आहे.

गेल्या आठवड्यातच देशाचे अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजप सरकारने अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा केल्या. त्यामुळे आता राज्याचा अर्थसंकल्प कसा असणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष्य असणार आहे. महाराष्ट्रात यंदा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका असणार आहेत त्यामुळे राज्य सरकार या अधिवेशनात नेमकं कशा स्वरूपाच अर्थसंकल्प सादर करणार हे उत्सुकतेच ठरणार आहे.