राष्ट्रपती राजवट : भाजपा सरकार हे मनमानी करणारं सरकार, राज्यातील नेत्यांनी व्यक्त केला संताप

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता असल्याने राज्यपालांनी गृह मंत्रालयाला पत्र पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राज्यात अधिकृतरीत्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यावर राज्यातील प्रत्यके पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपा सरकार हे मनमानी करणारं सरकार आहे अशी टीका अहमद पटेल यांनी. राज्यपालांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं मात्र काँग्रेसला दिलं नाही यावरही अहमद पटेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एवढे दयावान राज्यपाल महाराष्ट्रला लाभले आहेत, अशी उपहासात्मक टीका केली आहे.

आम्ही राज्यपालांकडे केवळ ४८ तास मागितले होते मात्र राज्यपालांनी दिलदारपणा दाखवत अम्हाला पुढचे ६ महिनेच दिले आहेत. तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही निर्णय घेण्यासाठी आता बराच वेळ आहे, अशी मिश्कील टिप्पणी केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ठाकरी भाषेत राष्ट्रपती राजवटीचा धिक्कार केला आहे. राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. जे आज झालंय तो अपमान आहे. राज्यावर संकटे आहेत. यातच राज्यातील मतदात्यांचा घोर अपमान या नतद्रष्टांनी केला आहे, असे ट्वीट राज ठाकरे यांनी पोस्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या