सेनेच्या मंत्र्यांवर पाळत नाही- गृहराज्यमंत्री रणजित पाटील

टीम महाराष्ट्र देशा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर पाटील यांनी असे काहीही होत नसल्याचे म्हटले. शिवसेनेच्या कोणत्याच मंत्र्यावर पाळत ठेवली जात नसल्याचे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सोलापूर दिले आहे .

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्राँचच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्यानं एकच खळबळ उडाली होती. यानंतर विखे पाटील यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकारी मंत्र्यांनीच सरकारवर हेरगिरीचा आरोप केला आहे. सरकार पाळत ठेवत असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीडमधील जाहीर सभेत म्हटले.

मी गृहराज्यमंत्री होतो. पण असे काम कधी केले नाही. विरोधी पक्षांसंदर्भात समजू शकतो, विरोधी पक्ष काय बोलतात ते बघू वगैरे. पण सत्ताधारी पक्षातील मंत्री काय करतोय, हे पाहण्यासाठी सुद्धा पोलिस पाठवत आहात, असे कधी आयुष्यात पाहिले नाही. अस देखील रामदास कदम म्हणाले. यावर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सोलापूर यथे स्पष्टीकरण दिले . शिवसेनेच्या कोणत्याच मंत्र्यावर पाळत ठेवली जात नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केलं .