सरकारला उशिरा सुचले शहाणपण; आता पूरग्रस्तांना रोख रक्कमेत दिली जाणार मदत

blank

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

या पूरग्रस्तांसाठी सरकारने १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी थेट बँकांच्या काह्त्यात जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली होती. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला कॉंग्रेसने विरोध दर्शवला होता. त्यामुळे सरकारने आता निर्णय बदलला आहे.

आता नव्या निर्णयानुसार पूरग्रस्तांना मदती साठी दिला जाणारा निधी हा रोख रक्कमेत दिली जाणार आहे. सरकारकडून रोख रक्कम देण्याचे अधिकार जिल्हाअधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता बँकेच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. सरकारच्या आधीच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनी नाराजी दर्शवली होती.

दरम्यान, पुरामुळे घरातील वस्तूं सोबत बँकाची कागद पत्रे देखील भिजून खराब झाली आहेत. अशा स्थिती नागरिकांना बँकेत जाऊन पैसे काढणे अवघड होते. तसेच वीज पुरवठा देखील नसल्यामुळे तांत्रिक अडचणी असल्यामुळे बँकांची ATM मशीन देखील बंद आहेत. त्यामुळे खात्यात टाकलेले पैसे नागरिक कसे काढणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या निर्णयावर सर्व बाजूने टीका केली जात होती त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घेतला आहे.

कलम ३७० हटवणे घटनाबाह्य नाही, रशियन सरकारचाही भारताला पाठींबा

 

‘काळजी करू नका मी आहे ना’ उदयनराजेंनी पूरग्रस्तांना दिला धीर

 

पूरपरिस्थितीचे सरकारला कसलेच गांभीर्य नाही, थोरातांचा घणाघात