पुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…

udhav-amit

मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी नुकतेच पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. तसेच, या मागणीसाठी अमित ठाकरे हे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनासुद्धा भेटले होते. पुतण्या अमित ठाकरे यांची ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची आणखी एक मागणी मान्य केली आहे. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच, यामुळे डॉक्टर्सना सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे, असंही ते म्हणाले.

पाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसेच आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्याआधी अमित ठाकरे यांनी पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या दोन्ही मागण्या आता पूर्ण झाल्या आहेत.

चक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग