Share

State Govt | शिंदे गटातील ५१ आमदार-खासदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा तर अमृता फडणवीसांच्या सुरक्षेत देखील वाढ

State Govt | मुंबई : महाविकास आघाडी नेत्यांच्या सुरक्षेत कप्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आता राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेत जाहीर केला आहे. शिंदे गटातील ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे कार्यभार असणाऱ्या गृह विभागाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील सर्व आमदार आणि खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदेंना पाठिंबा देणाऱे रामटेक लोकसभा मतदारसंघातील खासदार कृपाल तुमाने, भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेमध्ये समावेश आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस आणि

एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाय प्लस सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीस यांना वाय प्सल दर्जाची सपरक्षा होती. मात्र, अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यापुढे एक्स दर्जाची सुरक्षा मिळणार आहे.

दरम्यान, अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असून, बॉलिवूड अभिनेता सलमान खानला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

State Govt | मुंबई : महाविकास आघाडी नेत्यांच्या सुरक्षेत कप्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आता राज्य सरकारने (State …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now