आता उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास सरकारला फरक पडत नाही – रामदास आठवले

पुणे : नारायण राणे यांनी आजच आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. आता राणे हे एडीएमध्ये येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान नारायण राणे हे एनडीएमध्ये आल्यास आपण शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार पडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आल होता. या बाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता राणे यांच्या एनडीएमध्ये येण्याने उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडल्यास काहीच फरक पडणार नसल्याच त्यांनी सांगितल आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली असून त्या अगोदर त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली होती का ? अस विचारलं असता  ‘नारायण राणे यांच्या बाबत काय करता अस मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. तसेच त्यांना तुम्ही भाजप मध्ये घ्या नाही तर मी रिपाइं मध्ये घेतो’. असे बोललो असल्याच सांगितले. तसेच आता त्यांनी एक पक्ष स्थापन केला असून भविष्यात एनडीएचा घटक असतील आणि त्यांना सामावून देखील घेतले जाईल अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

You might also like
Comments
Loading...