फडणवीस सरकार देणार होते भिडे गुरुजींना ‘पद्मश्री’पुरस्कार

टीम महाराष्ट्र देशा: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नावाची २०१५ मध्ये राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान, स्वत: भिडे गुरुजींनीच हा पुरस्कार नाकारल्याच कळतय.

पद्मश्री पुरस्कारासाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाते. यामध्ये अनेकांकडून स्वत: अर्ज केला जातो, तर राज्य सरकारही नाव सुचवू शकते. पद्म पुरस्कारांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारडून दहा मंत्र्यांची समिती बनवण्यात आली होती. ज्याचे अध्यक्ष प्रकाश मेहता हे होते. या समितीने भिडे गुरुजींना समाजसेवेसाठी पुरस्कार देण्याची शिफारस 2015 मध्ये केंद्र सरकारकडे केली होती.

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारामागे भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading...