रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील

ranajagjit sinh

उस्मानाबाद : राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तुळजापूर हे धार्मिक पर्यटन क्षेत्र रेल्वेच्या नकाशावर आणण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सोलापुर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव २२ जुलै २०१८ रोजी मंजूर केला. या रेल्वे मार्गासाठी लागणारा ५०% खर्च राज्य शासनाने उचलावा अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह यांनी केली आहे.

सोलापूरहून तुळजापूर मार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या ८४ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी ९०४ कोटी खर्च अपेक्षित आहे. उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गामुळे राज्यातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक तुळजापूर तिर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येईल. हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. राज्यातील वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाच्या खर्चापैकी ५०% टक्के हिस्सा राज्य सरकारने केद्रींय रेल्वे बोर्डास उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ स्तरावर घेतला आहे.

याप्रमाणेच राज्य सरकारने सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या खर्चासाठी ५०% टक्के खर्च राज्य शासनाने उचलावा या मागणीसाठी सातत्याने पाठपूरावा करत आहोत. महाराष्ट्र सरकारचे ५०% हिस्सा उचलणे बाबत संमती पत्र रेल्वे बोर्डाकडे उपलब्ध नाही. या निवेदनासोबत रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता यांचे ८ जानेवारी २०२१ चे पत्र सोबत जोडले आहे. रेल्वे मार्गाच्या ५०% खर्च उचलण्याचा निर्णय आणि संमतीपत्र संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापुर्वी घ्यावा असे राणाजगजितसिंह यांनी म्हणले आहे.

महत्वाच्या बातम्या