तेली समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक – मुख्यमंत्री

नवी दिल्ली : तेली समाजाच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक असून या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे बाजू मांडण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  येथे दिली.तालकटोरा स्टेडियममध्ये अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या वतीने आयोजित तेली एकता रॅली आणि महासंमेलनात ते  बोलत होते.

झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्रसिंह कुशवाह, दिल्लीचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्यासह अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे अध्यक्ष तथा आमदार जयदत्त क्षीरसागर, खासदार रामदास तडस आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, तेली समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान असून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार कटीबद्ध आहे. तेली समाजासह इतर मागासवर्गियांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने विविध निर्णय घेतले आहेत. तेली समाजासोबतच इतर मागास समुहातील विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये उच्च शिक्षणाच्या विविध सोयी आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील 602 अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सवलत दिली आहे. देशातील अन्य कुठल्याही राज्यांपेक्षा ही संख्या अधिक आहे.

You might also like
Comments
Loading...