घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंचे आता घरही होणार जप्त

डी एस कुलकर्णी

पुणे: गुंतवणूकदरांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अटकेत असलेले डी एस कुलकर्णी यांच्या मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे, यामध्ये डीएसकें आणि त्यांच्या पत्नी हेमांगी यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये १२४ ठिकाणी असलेल्या जमिनी, वैयक्तिक आणि विविध कंपन्यांच्या नावाने असणारी २७६ बँक खाती तसेच ४६ आलिशान चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचा समावेश आहे.

गुंतवणूकदारांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमांगी या सध्या येरवडा कारागृहात आहेत, दोघांच्या विरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम 1999 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने राज्य सरकारकडून कुलकर्णी यांच्या मालमत्ता शोधण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने डीएसके यांच्याकडे १२४ ठिकाणी जमिनी, २७६ बॅंक खाते, ४६ वाहने असल्याचा अहवाल तीन महिन्यांपूर्वी पाठवण्यात आला होता.