अखेर राज्य सरकारकडून भिडेंची उचलबांगडी

टीम महाराष्ट्र देशा– राज्य सरकारने आरे कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आता मेट्रो-३  च्या प्रकल्प व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता रणजितसिंग देओल यांची  मुंबई मेट्रो-३ च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी  रणजितसिंग देओल हे महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करत होते. आता रणजितसिंग देओल हे मेट्रो-३ चा कार्यभार पाहणार आहेत.

Loading...

दुसरीकडे अश्विनी भिडे यांचा मेट्रो-३ च्या संचालक पदाचा कार्यकाळ डिसेंबरमध्येच पूर्ण झाला होता. त्यामुळे भिडे यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही.

आरे येथील प्रस्तावित मेट्रो-३ च्या कारशेडचं अश्विनी भिडे यांनी समर्थन केलं होतं. तसेच रात्रीच्या अंधारात झाडांची झालेली कत्तल यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आरे कारशेडला विरोध दर्शवला होता. या कारशेडचं समर्थन करणाऱ्या अश्विनी भिडे यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'