कोरोनाचा धोका वाढला : सरकार एसटी बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ST uddhav thackeray

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यभरात निर्बंध लादले आहेत. मात्र सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

मात्र आता कोरोना संसर्ग पसरण्याचा वेग मोठा असल्याने सरकार आणखी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून एसटी बस सेवेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. आंतरराज्यीय एसटी वाहतूक बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत आंतरराज्य एसटीची प्रवास वाहतूक सुरू आहे. त्यापैकी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील एसटी वाहतूक आधीच बंद केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारही इतर राज्यातील एसटी प्रवास वाहतूक बंद करून कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या