‘लसीचा पुरवठा वाढवा अशी मागणी करत राज्य सरकार त्याचं अपयश लपवत आहे’

udhhav

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. ही वाढ थांबवण्यासाठी जलद लसीकरण करण्याची गरज असल्याची भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली आहे.

रोज सहा लाख लसी देण्याचं लक्ष्य महाराष्ट्र सरकारने ठेवलं आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेत अडसर येतो आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होत. राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लशींचा साठा असल्याची माहिती आज टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी टोपे यांनी केंद्राकडून लशींचा पुरवठा होत असला तरी त्यात वेग नाही असे म्हणाले होते.

तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी लस पुरवठ्याबाबत केंद्र सरकार महाराष्ट्रावर जाणून बुजून अन्याय करत असल्याचे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते व प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यांनी ट्वीट करून काही आकडेवारी मंडळी आहे.

‘महाराष्ट्राला लस कमी, लसीचा पुरवठा वाढवा अशा मागण्या करीत आपल अपयश लपविण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. पण ही वस्तुस्थिती
१. आरोग्यकर्मचारी, कोवीड योद्धेज्येष्ठ नागरिकांचे लसीकरणपूर्ण झाले असायला हवे मात्रआता पहिलाडोस 86%आरोग्य कर्मचा-यांना तर 41% कर्मचा-यांना दुसराडोस दिला.
२. महाराष्ट्रात केवळ 73 टक्के कोवीड योद्ध्यांना आत्तापर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस तर 41 टक्के कोवीड योद्ध्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस दिला गेलाय
३. केवळ 25 टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. ही वस्तुस्थिती असताना केवळ राज्य सरकारचे लसीकरणातील अपयशावर पांघरूण घालण्यासाठी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा खटाटोप केला जात आहे.’ अशी टीका त्यांनी या माध्यमातून राज्य सरकारवर केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा. २५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे आज केली आहे.

महत्वाच्या बातम्या