शासनाने नेमक कराव तरी काय?, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : रत्नागिरी जिल्ह्यातील  नाणार येथील प्रस्तावित बहुचर्चित तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रायगड जिल्ह्य़ात हलवण्यात आला आहे. मात्र आता ‘नाणार’ मधील काही संस्थांनी एकत्र येत तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्याच ठरवल आहे. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी शनिवारी, २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा प्रकल्प पुन्हा नाणारमध्ये आणण्यासाठी ‘नाणार’ मधील काही संस्थांनी एकी केली आहे. तसेच तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळे या ‘नाणार’मधील काही संस्थांच्या अध्यक्षांनी एकत्र येत आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी नाणार प्रकाल्पाच्या समर्थनात वक्तव्य केली.

यावेळी ते म्हणाले की, मूठभर प्रकल्प विरोधक आणि राजकारण्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे; पण त्यांच्या दबावामुळे प्रकल्पाला पाठिंबा असलेले बहुसंख्य गप्प राहिले; पण आता वातावरण बदलले आहे. त्यामुळे नाणारच्या समर्थनात अशी मोहीम सुरू करण्यास थोडा उशीर झाला आहे, हे खरे असले तरी अजूनही वेळ निघून गेलेली नाही, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र स्थानिक गावकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. तसेच शिवसेनेकडून देखील या प्रकल्पाला तीव्र विरोध झाला होता. त्यानंतर हा प्रकल्प नाणार येथून हलवण्यात आला. प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. त्यामुळे नाणार प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. तसेच तिथल्या स्थानिक ४० गावांचा भूसंपादानाला विरोध नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशना वेळी दिली आहे.