कोरोना काळात १०लाख कामगारांना राज्य सरकारने केली मदत – वळसे पाटील

Dilip Walase Patil

मुंबई : बिल्डींग आणि कन्स्ट्रक्शन कामातील नोंदणीकृत कामगारांना राज्य सरकारकडून पहिले दोन हजार आणि नंतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांना तीन हजार रुपये मदत म्हणून कोरोनाच्या संकटात देण्यात आले आहेत. राज्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे काम बंद आहे त्यामुळे कामगारांना हाताला काम नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्योंगासमोर मोठे आव्हान आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार या उद्योगांना पुन्हा सुरू करायचा निर्णय घेत आहे. त्यामुळे कामगारांना रोजी रोटी मिळेल. हाताला रोजगार मिळेल. यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि भविष्यात या निर्णयाला नक्की यश मिळेल. आत्तापर्यंत अंदाजे राज्य सरकारने नोंदणीकृत १० लाख कामगारांना प्रत्येकी ५००० रूपये मदत केलेली आहे. अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :