राज्य सरकारचा मराठी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : सिंधुदुर्गात प्राथमिक शिक्षक समितीच्या १६व्या अधिवेशनात बोलतांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एसएसएसी आणि सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर मराठी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा केली.यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १०० शाळांची निवड करण्यात येणार आहे.

अधिवेशनाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. मुंडे म्हणाल्या, शिक्षकांवरील अतिरिक्त कामातून सुटका करण्याच्या दिशेने काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. तसेच शिक्षकांना आता एमएस-सीआयटी पूर्ण करण्यासाठी मार्च २०१८ च्या पुढे कालावधी वाढवून दिला जाणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या १६ व्या अधिवेशनाची आज सांगता झाली. राज्यभरातील हजारो शिक्षकांनी या अधिवेशनाला हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी मात्र या अधिवेशनाकडे पाठ फिरवली.

You might also like
Comments
Loading...