fbpx

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

टीम महाराष्ट्र देशा : सरकारने सातव्या वेतन आयोग देण्याबाबत वारंवार टाळटाळ केल्याच सांगत राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. हा संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी अधिकृत घोषणा केली नाही मात्र थोड्याच वेळात ते अधिकृत घोषणा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यभरातील तब्बल 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून कायम आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला होता. मागील आठवड्यात 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी संपावर जाण्याचा इशारा राज्यातील प्रमुख कर्मचारी संघटनाकडून देण्यात आला होता.

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर ; केंद्रीय नेतृत्वाचे मुख्यमंत्र्यांना आदेश