बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त, सरकारकडून जाहिरात प्रसिद्ध

मुंबई: होईल होईल म्हणता म्हणता अखेर राज्य शालेय शिक्षण विभागातील शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला आहे. भरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शासनच्या ‘पवित्र’ वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक भरती अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी राज्यभरत १०,००१ शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. यापैकी अनुसूचित जातीसाठी- १७०४, अनुसूचित जमातीसाठी- २१४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश आहे.

पवित्र वेबपोर्टलच्या माध्यमातून यंदा प्रथमच शिक्षक भरती केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरत असताना गोंधळून न जाता, माहिती शांतपणे वाचावी, जेणेकरुन कमी त्रुटी राहतील, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी वेबसाईट edustaff.maharashtra.gov.in