राज्यामध्ये कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने संपूर्ण शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केवळ 2 रुपये किलो अनुदान देऊन सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, त्यांची फसवणूक आणि थट्टा केल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
उत्पादन खर्च 800 रु क्विंटल असतांना शेतकऱ्यांना 100 रु भाव मिळत आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांना 500 रु प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली आहे. 2016 मध्येही सरकारने कांद्याला एक रु अनुदान जाहीर केले होते, मात्र ते मिळण्यास दीड वर्ष लागले ते कोणाला मिळाले आणि कोणाला नाही याचाही पत्ता नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. सरकारने 5 रुपये अनुदान देत ते एक महिन्याच्या आत शेतक-यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील मुंडे यांनी दिला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केवळ 2 रुपये किलो अनुदान देऊन सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, त्यांची फसवणूक आणि थट्टा केली आहे. उत्पादन खर्च 800 रु क्विंटल असतांना शेतकऱ्यांना 100 रु भाव मिळत आहे त्यामुळेच शेतकऱ्यांना 500 रु प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे. pic.twitter.com/0i80fjLCbk
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 20, 2018
कांद्याला प्रति क्विंटल २०० अनुदान
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेले काही दिवस किलोमागे १ ते २ रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा वाढता रोष लक्षात घेता सरकारनं प्रति क्विंटल २०० रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. १५ डिसेंबरपर्यंत कांदा बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम मिळेल. याशिवाय परराज्यातील कांद्यांच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा विचार आहे. कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन दिलं जाणार असल्याच सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
1 Comment