पशुपालकांना दिलासा, चारा छावण्यातील जनावरांच्या अनुदानात वाढ

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्यासाठी राज्य सरकारने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकार प्रति पशु १८ किलो चारा, पाण्यासाठी ९० रुपये अनुदान छावणी चालकांना देत आहे. याचदरम्यान राज्यसरकारने ९० रुपयाऐवजी १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पशुपालकांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे छावणी चालकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थिवर मात करण्यासाठी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुमारे साडे सतराशे चारा छावण्या सुरू केल्या आहेत. छावण्यातील मोठ्या पशूला ९० रुपये तर लहान पशूला ४५ रुपये अनुदान राज्य सरकारतर्फे दिले जात होते.

आज मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या बैठकीत मोठ्या पशूला १०० रुपये तर लहान पशूला ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला असून छावणी चालकातही उत्साह संचारला आहे.