राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या, काय सुरू आणि काय बंद राहणार ?

udhav thackarey

मुंबई : केंद्र सरकारने अनलॉक १ ची घोषणा शनिवारी केली. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर आता राज्य सरकारने अनलॉक १ साठीची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आठ जूनपासून प्रार्थनास्थळे, हॉटेल, मॉल सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहील. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळतही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू असेल.

65 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी घरातच राहावे.कोरोना रुग्णांची संख्येनुसार जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाने कंटेन्मेंट झोन घोषित करावेत. हा कंटेन्मेंट झोन हा एकदा परिसर, नगर, इमारत, झोपडपट्टी किंवा शहरात घोषित केला जावू शकतो. या भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वया भागातील कायदेशीरपणे कडक कारवाई करण्यात येईल.

शेतकऱ्यांनी कापसाच्या वाती करून शासनाची आरती ओवाळाची का?

राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता जनजीवन सुरु करण्यात येणार आहे. राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मैदानेही खुली केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

सामुहिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य असणार आहे. केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास मुभा दिली आहे. गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

दिलासादायक : कोविड-19 वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध होणार