fbpx

विरोधकांच्या दबावासमोर सरकार नमले ; अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित

टीम महाराष्ट्र देशा : विरोधकांच्या अभूतपूर्व गोंधळासमोर अखेर सरकारने गुडघे टेकत अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित करण्याची घोषणा केली.

दरम्यान, अंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करावा, या मागणीवरुन काल विधानसभेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. मेस्मा कायदा रद्द करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला विरोधकांनीही पाठिंबा दिला होता.

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे या मात्र अंगणवाडी मेस्मा कायद्यावर ठाम होत्या पण आता या कायद्याला स्थगिती देणे म्हणजे विरोधकांच्या दबावाचा विजय मनाला जात आहे.